भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेने करणार आहे. मंगळवारपासून (३ जानेवारी २०२३) उभय संघांमधील ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. टी-२० मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका संघ ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भिडणार आहेत. अर्थात, श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असेल, पण एकूण आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, पाहुण्याविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटची लढत झाली होती. जिथे टीम इंडियाचा पराभव झाला होता. सध्या भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे, तर पाहुण्या संघाचे नेतृत्व दासुन शनाका करणार आहे. टीम इंडियाला आशिया कपमधील पराभवाचा हिशोबही बरोबर करायचा आहे. त्याचबरोबर वर्षाची विजयी सुरुवात करण्याकडे भारताचे लक्ष असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड –
भारत आणि श्रीलंका संघ आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६ वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत भारताने १७ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ८ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित आहे. या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर उभय संघांमध्ये आतापर्यंत ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली गेली आहे, ज्यामध्ये भारतीय संघ ७ वेळा जिंकू शकला आहे, तर एक मालिका पाहुण्यांच्या नावावर राहिली आहे. तसेच एक मालिका अनिर्णीत संपली आहे. दरम्यान श्रीलंकेचा संघ अजूनही भारतात पहिल्या टी-२० मालिकेतील विजयाची वाट पाहत आहे.
दोन्ही संघांतील मागील मालिका –
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील शेवटची द्विपक्षीय टी-२० मालिका २०२१-२२ मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला. जिथे ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. भारताने त्या मालिकेत पाहुण्या संघाचा ३-० असा क्लीन स्वीप केला. मालिकेतील दुसरा टी-२० सामना ५ तारखेला पुण्यात तर तिसरा आणि शेवटचा सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. गुवाहाटी येथे १० जानेवारीपासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होणार आहे.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू: सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर, या मालिकेत रोहित शर्माचा सहभाग नाही. रोहितच्या नावावर ४११ धावा आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू दासून शनाका आहे, ज्याने ३०६ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू: भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू युझवेंद्र चहल आहे, जो या मालिकेत देखील खेळत आहे. चहलने १० सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. १६ विकेट्ससह, दुष्मंत चमीरा हा भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा श्रीलंकेचा गोलंदाज आहे.