भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याचे हे टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत २२८ धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंका संघाला २२९ धावांचे लक्ष्य दिले.
शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची भागादारी केली. त्यानंतर शुबमन गिल ४० धावा काढून बाद झाला. त्यानंतर आपले तिसरे शतक पूर्ण केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्यानंतर हार्दिक पांड्या तंबूत परतला. रजिथाने त्याला १६व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धनंजयकरवी झेलबाद केले. हार्दिक ४ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपक हुडाच्या रूपाने भारताची पाचवी विकेट गेली. हसरंगाच्या हातून हुड्डाला मधुशंकाने झेलबाद केले. हुडाने २ चेंडूत ४ धावा केल्या.
श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना दिलशान मधुशंकाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर रजिथा वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आता श्रीलंका संघाला ही मालिका जिंकण्यासाठी २२९ धावा करायच्या आहेत.
श्रीलंका संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लांका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तिक्ष्ण, कसून राजिता, दिलशान मधुशंका.
भारतीय संघ; इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.