भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवीन वर्षात जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात टी२० मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका संघ तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारी रोजी सुरू होणार असून यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल उपस्थित नसतील, असे सांगितले जात आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि फॉर्मात नसलेला सलामीवीर केएल राहुल जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेला मुकणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दोघेही न खेळण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीतून रोहित अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही, असे अहवालात म्हटले आहे.
बीसीसीआयमधील एएनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेदरम्यान लग्न करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत समान सामन्यांची तीन टी२० आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. विशेषत: रोहित आणि केएलसाठी ही मालिका महत्त्वाची होती, ज्यांना २०२२ मध्ये फलंदाजी चांगली करता आली नाही.
रोहित शर्माने २०२२ मध्ये काही वेळा त्याच्या ‘हिटमॅन’ टॅगनुसार जगण्यासाठी संघर्ष केला आहे. या वर्षी दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने ४६च्या सर्वोत्तम स्कोअरसह ३०च्या सरासरीने ९० धावा केल्या. आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४१.५० च्या सरासरीने २४९ धावा केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याने २९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६५६ धावा केल्या, ज्यामध्ये तो केवळ ३ वेळा अर्धशतके करू शकला.
दुसरीकडे, केएल राहुलने या वर्षी चार कसोटी सामने खेळले असून, एका अर्धशतकासह त्याने १७.१२ च्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. या वर्षी १० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २७.८८ च्या सरासरीने केवळ २५१ धावा केल्या ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, २०२२ मध्ये १६ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, केएल राहुलने २८.९३ च्या सरासरीने ४३४ धावा केल्या, जिथे त्याने सहा अर्धशतके झळकावली.
हेही वाचा: India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला ट्वेन्टी-२० सामना कधी? कुठं मोफत पाहता येणार
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील यांत्यातील टी२०आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआय मंगळवारी (२७ डिसेंबर) संघाची घोषणा करू शकते. उभय संघांतील टी२० मालिकेत हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी२० फॉरमॅटमधील कामाचा भार कमी करण्यासाठी बीसीसीआय नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक नियुक्त करणार असल्याचे काही दिवसांपासून सांगितले जात आहे. अशात याविषयीचा निर्णय लवकरच समोर येऊ शकतो.