भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात टी२० मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका संघ तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. उभय संघांतील टी२० मालिका ३ जानेवारी रोजी सुरू होणार असून यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल उपस्थित नसतील, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. विराटऐवजी ३१ वर्षीय खेळाडूला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या वयातही हा खेळाडू पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे.
३१ वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीचा संघात समावेश
कदाचित असे दिसत आहे की, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र काही फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंचा देखील विचार केला जात आहे. त्यात अशा स्थितीत मधल्या फळीत फलंदाजीसाठी ३१ वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीचा संघात समावेश केला जाऊ शकतो. राहुल त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा भाग बनला होता, परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
राहुल त्रिपाठीने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामने खेळून ४१४ धावा केल्या होत्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात येत होते. सलामीशिवाय राहुल त्रिपाठी मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी आणि त्याआधी इंग्लंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये संघासोबत गेला होता.
मालिकेत सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ मिळणार संधी
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ संधी मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉने २०२१ मध्ये भारतासाठी पहिला आणि शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता पुन्हा एकदा त्याला भारताच्या टी२० संघात स्थान मिळू शकते. पृथ्वी शॉने आयपीएल मध्ये १४७.४५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. अशा परिस्थितीत एक सलामीवीर म्हणून तो टीम इंडियामध्ये आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो.
शॉ सलामीला झटपट फलंदाजीसाठी ओळखला जातो. केएल राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून सतत धावा येत आहेत. शॉ देखील गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर सतत काम करताना दिसत आहे. आयपीएल २०२२ पासून त्याने ७ ते ८ किलो वजन कमी केले आहे.