India vs Wales Hockey World Cup 2023 Match Updates: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाने गुरुवारी (१९ जानेवारी) वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळला. त्यांनी पूल डी मध्ये वेल्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह भारताने गुणतालिकेत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला आता क्रॉस ओव्हरचा सामना खेळावा लागणार असून तो २२ जानेवारीला न्यूझीलंडशी होणार आहे.
भारताने शेवटच्या साखळी सामन्यात वेल्सचा ४-२ असा पराभव केला असला तरी या विजयासह टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच पूल मध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या इंग्लंड आणि भारताचे जरी सात गुण असले तरी टीम इंडिया गोलच्या फरकाने मागे आहे. भारतापेक्षा इंग्लंडने जास्त गोल केले. टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता अंतिम-८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी ते क्रॉसओव्हरमध्ये न्यूझीलंडशी खेळतील.
FIH पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ मधील भारतीय हॉकी संघाचा हा दुसरा विजय आहे. याआधी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात स्पेनचा २-० असा पराभव केला होता, तर इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून समशेर सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी गोल केले. भारतासाठी पहिला गोल समशेर सिंगने केला. पूर्वार्धापर्यंत भारतीय संघ २ गोल करत आघाडीवर होता. पण तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटी, वेल्सने पेनल्टी कॉर्नरमध्ये रूपांतरित करून स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला. भारताने चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करून विजय मिळवला. भारत तीन सामन्यांत सात गुणांसह ड गटात दुसऱ्या स्थानावर आहे. या पूलमध्ये इंग्लंडचा संघ अव्वल ठरला. त्याला ७ गुण आहेत. याआधी भारताने स्पेनचा २-० असा पराभव केला आणि इंग्लंडविरुद्ध बरोबरी साधली.
तत्पूर्वी, पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि वेल्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी संधी निर्माण केल्या मात्र गोल करण्यात अपयश आले. मिडफिल्डर हार्दिक सिंग या सामन्यात खेळत नाही. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीत असताना त्याला दुखापत झाली होती.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा फायदा संघाला घेता आला नाही. संघ दबावाखाली खेळताना दिसत आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण हरमनप्रीतचा ड्रॅग फ्लिक पुन्हा एकदा रोखला गेला. दरम्यान, समशेरने अप्रतिम काम केले. भारताच्या समशेर सिंगने २१व्या मिनिटाला गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त सुरुवात केली होती. आकाशदीपने तिसऱ्याच मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट केली. काही वेळाने भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. पण वेल्सचा बचाव सज्ज होता. 33व्या मिनिटाला आकाशदीपने मनदीपच्या मदतीने गोल करण्यात यश मिळविले. तिसऱ्या क्वार्टरच्या ६व्या मिनिटाला भारताला पेनल्टीही मिळाली. पण इथे पुन्हा संघ चुकला. भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या क्वार्टरमध्ये वेल्सला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण त्याचा फायदा उठवता आला नाही. १२व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण तो पुन्हा हुकला. १३व्या मिनिटाला वेल्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आणि फर्लाँग गॅरेथने त्याचे रूपांतर केले. वेल्सने पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी पेनल्टी कॉर्नर जिंकला आणि त्याचे रूपांतर २-२ असे केले.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच मैदानी गोल करत आकाशदीप सिंगने भारताला आघाडी मिळवून दिली. या सामन्यातील आकाशदीपचा हा दुसरा गोल आहे. यापूर्वी त्याने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला होता. चौथ्या क्वार्टरच्या ९व्या मिनिटाला अभिषेकने जवळपास गोल केला. मात्र चेंडू विरोधी संघाच्या शरीरावर आदळला आणि गोलपोस्टमध्ये गेला. चौथ्या क्वार्टरच्या शेवटी भारताला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. या क्वार्टरच्या शेवटी भारताने वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना जिंकला आहे.
भारत आणि वेल्स यांच्यात आतापर्यंत एकूण तीन हॉकी सामने झाले होते. यामध्ये भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. भारताने २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत वेल्सचा तीनदा पराभव केला होता. गेल्या वर्षी बर्मिंगहॅममध्ये भारताने वेल्सवर ४-१ असा विजय नोंदवला होता. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही देश प्रथमच आमनेसामने आले आणि त्यातही भारताने ३-२ने विजय मिळवला.