कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर मात केली. विराट कोहलीने, विंडीजने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ९४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने रोहित शर्माला पुन्हा एकदा मागे टाकलं आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला विराटने टाकलं मागे

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज –

  • विराट कोहली – २३*
  • रोहित शर्मा – २२
  • मार्टीन गप्टील – १७

पहिल्या विजयासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतरपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader