विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेलं २०८ धावांचं आव्हान भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर पूर्ण केलं. विराट कोहलीने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ९४ धावा केल्या. या खेळीसह विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता दुसऱ्या स्थानी आहे. विंडीजविरुद्ध त्याने केलेली ९४ धावांची खेळी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली (७५ + या निकषामधली) ११२ वी खेळी ठरली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज –

  • सचिन तेंडुलकर – १६८ वेळा
  • विराट कोहली – ११२ वेळा*
  • रिकी पाँटींग – ११२ वेळा
  • जॅक कॅलिज – १११ वेळा

या मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतरपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : विराटचा शाहिद आफ्रिदीला धोबीपछाड, मिळवलं दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान