IND vs WI 1st ODI Ind won the toss and decided to bowl: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणार आहे. कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला वनडेतही विजयी सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुकेश कुमार टीम इंडियासाठी डेब्यू वनडे सामना खेळणार आहे.
वनडेतही भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व आहे –
कसोटीप्रमाणेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. विंडीजने शेवटची वनडे मालिका २००६ मध्ये भारताविरुद्ध जिंकली होती. त्यानंतर भारताने विंडीजविरुद्ध सलग १२ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. आता त्याचे लक्ष्य सलग १३वी वनडे मालिका जिंकण्यावर असेल.
मुकेश कुमारचे वनडे संघात पदार्पण –
मुकेश कुमारला आजच्या सामन्यासाठीच्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तो नुकताच पदार्पण कसोटी सामना खेळला होता. मुकेशने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला ही संधी मिळाली आहे. मुकेश हा उजव्या हाताचा मीडियम फास्ट बॉलर आहे. तो बंगालकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. यासोबतच तो शेष भारतीय संघाकडूनही खेळला आहे. मुकेशची देशांतर्गत सामन्यांतील कामगिरी पाहून त्याचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला. नुकतेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने एका सामन्यात दोन बळी घेतले होते. आता तो टीम इंडियासाठी वनडे डेब्यू मॅच खेळणार आहे.
मुकेशने २४ लिस्ट ए सामन्यात २६ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ७१ धावांत ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या ७२ डावांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशने ३३ टी-२० सामन्यात ३२ विकेट घेतल्या आहेत. त्याला इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये खेळण्याची संधीही मिळाली. मुकेश आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. मुकेश लयीत असून तो वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
वेस्ट इंडिज: शाई होप (कर्णधार/ यष्टीरक्षख), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाज, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जॅडन सील्स, गुडाकेश मोटी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.