India vs West Indies 1st ODI Match Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश कुमार भारताकडून वनडे पदार्पण करत आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ११४ धावा केल्या. त्याचबरोबर भारताला ११५ धावांचे लक्ष्य दिले आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ ११४ धावांवर गारद झाला. कुलदीप यादवने जेडेन सेल्सला बाद करून वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. सेल्सने तीन चेंडूंचा सामना केला पण त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपच्या चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याचा झेल टिपला.कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजचा संघ भारतासोबत स्पर्धा करण्यात अपयशी ठरला आहे. या डावात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने लय दाखवली नाही आणि कोणीही क्रिझमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न केला नाही.
कर्णधार होपने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय केवळ अथंजे २२, किंग १७ आणि हेटमायर ११ यांना दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेत वेस्ट इंडिजच्या तळातील फलंदाजांना सहज बाद केले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आता टीम इंडियाला ११५ धावांचे लक्ष्य सहज गाठायचे आहे आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घ्यायची आहे. मात्र, खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत आहे. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांनाही सावधपणे खेळावे लागणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
वेस्ट इंडिज: शाई होप (कर्णधार/ यष्टीरक्षख), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाज, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जॅडन सील्स, गुडाकेश मोटी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.