टी-२० मालिकेत भारतीय संघाने विंडीजवर २-१ ने मात केली. चेन्नईच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेल्डन कोट्रेलने सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत भारतीय फलंदाजांच्या धावगतीवर अंकुश लावला. सातव्या षटकात कोट्रेलने भारताला दोन दणके दिले. दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुलला बाद केल्यानंतर अखेरच्या चेंडूवर कोट्रेलने विराटचा त्रिफळा उडवला.

अवश्य वाचा – ….म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा

पहिल्याच सामन्यात विराट अवघ्या ४ धावा करु शकला. विराटच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट यष्टींवर जाऊन आदळला. या विकेटसोबतच कोट्रेलने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. विराट कोहलीला दोनवेळा त्रिफळाचीत करणारा तो पहिला वेस्ट इंडिज गोलंदाज ठरला आहे.

सलामीचे दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदारी श्रेयस अय्यरला सोबत घेऊन अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. मात्र यानंतर तो देखील ३६ धावांवर माघारी परतला.

अवश्य वाचा – दुखापतग्रस्त भुवनेश्वर न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार??

Story img Loader