India vs West Indies 1st T20 Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांना गुरुवारी (३ ऑगस्ट) सुरुवात झाली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने त्यांचा चार धावांनी पराभव केला. या विजयासह यजमानांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नवोदित तिलक वर्मा वगळता सर्वांनी निराशा केली. तिलकने संघाकडून सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. संथ विकेटवर, सेट झाल्यानंतर भारतीय फलंदाज बाद होत राहिले. याचा फटका संघाला सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने २१, कर्णधार हार्दिक पंड्याने १९, अक्षर पटेलने १३, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंगने १२-१२ धावा केल्या. इशान किशन सहा आणि शुबमन गिल तीन धावा करून बाद झाले.

हेही वाचा – IND vs WI 1st T20 Updates: वेस्ट इंडिजचा शानदार विजय, अटीतटीच्या सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव

भारताला विजयासाठी शेवटच्या पाच षटकात ३७ धावा करायच्या होत्या. त्यावेळी संघाची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावसंख्या होती. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन क्रीजवर होते. इथून टीम इंडिया सहज टार्गेट जिंकेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. हार्दिक पांड्याच्या रूपाने संघाला पाचवा धक्का बसला. त्यानंतर संजू सॅमसन धावबाद होताच संघाच्या आशा संपुष्टात आल्या. अर्शदीपने अखेरच्या षटकात काही नेत्रदीपक फटके मारले, मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत. उभय संघांमधील मालिकेतील दुसरा सामना रविवारी (६ ऑगस्ट) गयाना येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 1st t20 match updates west indies beat india by 4 wickets vbm