IND vs WI 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबायेथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने यजमान संघाचा ३-० असा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल. एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आलेला हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतही संघात पुनरागमन करणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या रविचंद्रन अश्विनला पहिल्या टी २० सामन्यामध्ये संधी मिळणार की नाही याबाबत उत्सुकता आहे.

ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन झालेले नाही. परंतु, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) भरपूर सामने याठिकाणी झाले आहेत. येथील पहिल्या डावातील धावसंख्या सरासरी १४१ आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये जून ते डिसेंबर हा साधारणपणे पावसाळी हंगाम असतो. त्यामुळे आजच्या सामन्यात अधून मधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND W Vs AUS W 1st T20 Live in CWG 2022 : भारतीय मुलींसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान; थोड्याच वेळात होणार नाणेफेक

संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, दीपक हुडा/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन/कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग</p>

संभाव्य वेस्ट इंडीज संघ : ब्रँडन किंग, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, अकिल होसेन, रोमारियो शेफर्ड, ओबेड मॅककॉय, हेडन वॉल्श /अल्झारी जोसेफ

Story img Loader