India vs West Indies 1st Test match when, where to watch: भारतीय संघ १२ जुलैपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवली जाणार आहे. यासह, दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या तिसऱ्या आवृत्तीला सुरुवात करतील. भारतीय संघ तब्बल एक महिन्यानंतर मैदानात उतरणार आहे. यापूर्वी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया मैदानावर वेस्ट इंडीजशी दोन हात करण्यासाठी उतरणार आहे. रोहित ब्रिगेड पहिलीच मालिका जिंकून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये विजयी प्रारंभ करण्याचा भारतीय संघाचा प्लॅन असेल. भारतीय चाहत्यांना मात्र ही मालिका बघण्यासाठी आपल्या दिवसाच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागणार आहे. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वेळेत खूप मोठी तफावत असल्याने भारतीय चाहत्यांना हे सामने मध्यरात्रीपर्यंत जागून पाहावे लागतील.
या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारताने आपल्या संघात काही मोठे बदल केले आहेत. सलग दोन WTC फायनलमधील पराभवानंतर आता निवडकर्त्यांनी कसोटी संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीतील वेस्ट इंडिज संघाची कामगिरी जर पाहिली तर ती खूपच खराब होती. संघ ८व्या स्थानावर राहिला. विंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्यांना २-०ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या कसोटी मालिकेत विंडीजचा कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट संघाकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करेल.
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये वेस्ट इंडिजचा वरचष्मा आहे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी फॉर्मेटमध्ये आतापर्यंत ९८ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने २२ सामने जिंकले आहेत आणि वेस्ट इंडिजच्या संघाने ३० सामने जिंकले आहेत. याशिवाय ४६ सामने अनिर्णित राहिले आहेत. २००२ पासून, भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकाही कसोटी मालिकेत पराभवाचा सामना केला नाही आणि आतापर्यंत सलग ८ मालिका जिंकल्या आहेत.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका पहिला सामना कधी आणि कुठे पाहायचा?
या मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे सुरू होणार आहे. या सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल. डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि जिओ सिनेमावर केले जाईल.
भारत आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघातील खेळाडू:
वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझ, तागेतारीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रीफर, केमार वॉर्मल रोच
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रीकर भारत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार