India lead by 250 runs by the lunch break of the third day: भारत आणि वेस्ट इंडिज संघात डॉमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात ४०० धावा पूर्ण केल्या आहेत. तिसर्‍या दिवशी उपाहाराची घोषणा झाली तेव्हा टीम इंडियाने चार विकेट गमावत ४०० धावा केल्या आहेत. विराट कोहली ७२ आणि रवींद्र जडेजा २१ धावांवर नाबाद आहेत. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली आहे. भारतीय संघाने उपाहारापर्यंत २५० धावांची आघाडी घेतली आहे.

यशस्वी जैस्वालचे द्विशतक हुकले –

यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. तो १७१ धावा करून बाद झाला. यशस्वीने ३८७ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला. अल्झारी जोसेफच्या चेंडूवर जोशुआ डी सिल्वाने त्याला विकेटच्या मागे झेलबाद केले. भारतीय संघाला यशस्वीच्या रुपाने ३५१ धावसंख्येवर तिसरा धक्का बसला.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: यशस्वी जैस्वालचे हुकले द्विशतक, मात्र तिसऱ्या दिवशीही लावली ‘या’ विक्रमांची रांग

भारतीय संघाल चौथा धक्का बसला –

यशस्वी जैस्वालच्या जागी फलंदाजीसाठी आलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणे पहिल्या डावात फार काही करू शकला नाही. ११ चेंडूत तीन धावा करून तो बाद झाला. केमार रोचच्या चेंडूवर त्याला जर्मेन ब्लॅकवूडने झेलबाद केले. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेला रवींद्र जडेजा कोहलीला साथ देत आहे. कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याचे कसोटीतील हे २९ वे अर्धशतक आहे. अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारतीय संघाला ३६० धावसंख्येवर चौथा धक्का बसला.

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये केल्या १३५ धावा –

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलच्या दोन्ही डावात एकूण १३५ धावा केल्या होत्या. त्याने पहिल्या डावात ८९ आणि दुसऱ्या डावात ४६ धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर रहाणेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. निवड समितीच्या या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत रहाणे या दौऱ्यात फ्लॉप झाला तर त्याच्या जागेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण होतील.

Story img Loader