Pragyan Ojha Praises Ravichandran Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात डॉमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. त्याचवेळी या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची कामगिरी खूपच निराशाजनक होती. खरे तर टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज रविचंद्रन अश्विनसमोर कॅरेबियन संघाचा एकही खेळाडू जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. त्याने सर्वाधिक पाच विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळण्याचे काम केले. यावर आता प्रज्ञान ओझाने आश्विनचे कौतुक केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने रविचंद्रन अश्विनबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या जबरदस्त कामगिरीने अश्विनने दाखवून दिले आहे की, तो टीम इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे. प्रग्यान ओझाने अश्विनच्या गोलंदाजीचे खूप कौतुक केले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विनने घातक गोलंदाजी करत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. वेस्ट इंडिजने कॅरेबियन संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. यासह तो अनुभवी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. आता अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७०० बळी घेतले असून ही कामगिरी करणारा तो जगातील १६ वा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर हा विक्रम करणारा तो भारताचा फक्त तिसरा गोलंदाज आहे.
हेही वाचा – IND vs WI 1st Test; शुबमन गिलने फलंदाजी क्रमात बदल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला…’
प्रज्ञान ओझाने रविचंद्रन अश्विनचे जोरदार कौतुक केले –
प्रग्यान ओझाच्या म्हणण्यानुसार, अश्विनची गोलंदाजी कुठे खेळायचा याची कल्पना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नव्हती. जिओ सिनेमावरील संभाषणादरम्यान ओझा म्हणाला, “अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतके झळकावली आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते आणि तो सतत विकेट घेत आहे. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजांना उभे केले ते शानदार होते. अश्विन आपली गती सतत बदलत होता आणि कॅरेबियन फलंदाजांकडे अश्विनच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती.”
प्रज्ञान ओझा पुढे म्हणाला, “त्याने ज्या पद्धतीने डाव गुंडाळला त्यावरून अश्विन भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे दिसून येते. जर तुम्ही चॅम्पियन खेळाडूंकडे बघितले, तर ते नेहमीच त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करतात आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कामगिरी करतात. अश्विनने नेहमीच चेंडूने चांगली कामगिरी केली आहे आणि तीच कामगिरी तो सातत्याने करत आहे.”