Shubman Gill said after changing the batting order I want to get stronger: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केले. त्यातील यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासोबत सलामी देत आहे. त्यामुळे नेहमी सलामीला येणाऱ्या शुबमन गिलचा फलंदाजी क्रमांक बदलला आहे. यावर आता शुबमन गिलने फलंदाजी क्रम बदलण्यावर मनं जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
फलंदाजी क्रमांक बदलल्यानंतर शुबमन गिलचे वक्तव्य –
शुबमन गिलला त्याच्या नवीन फलंदाजी क्रमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मी भारत अ संघाच्या सामन्यांमध्ये ३ आणि ४ क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यांनी मला विचारले की मला कुठे फलंदाजी करायची आहे? आणि मी म्हणालो की मला तिसरा क्रमांक हवा आहे. ही एक अशी जागा आहे, जिथे मला मजबूत व्हायचे आहे. नवीन चेंडूने खेळणे नेहमीच चांगले असते आणि मला नवीन चेंडूचा अनुभव आहे.”
मी स्वत:ला वरिष्ठ खेळाडू समजत नाही –
शुबमन गिल पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असता, तेव्हा थोडा फरक असला तरी तो फारसा वेगळा नसतो. आता संघात माझ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी स्वत:ला वरिष्ठ खेळाडू समजत नाही.”
हेही वाचा – Duleep Trophy 2023: हनुमा विहारीने सोडले मौन; म्हणाला, “मला समजत नाही की टीम इंडियातून…”
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १५० धावांवर गारद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ३० आणि यशस्वी जैस्वाल ४० धावांवर खेळत आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ अजूनही पहिल्या डावात ७० धावांनी मागे आहेत