Yashasvi Jaiswal abusing to Kemar Roach Video goes viral: यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीतून कसोटी पदार्पण केले. यशस्वी हा अतिशय शांत क्रिकेटपटू मानला जातो, पण या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात त्याचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. त्याच्या आडवा आलेल्या केमार रोचला त्याने उघडपणे शिवीगाळ केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १०३ वे षटक टाकले जात असताना भारतीय डावात ही घटना घडली. वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमार रोच हे षटक टाकत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशस्वी जैस्वालने केमार रोचला केली शिवीगाळ –

केमार रोचने १०३व्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर एंडला परत गेल्यावर यशस्वी जैस्वालचा आवाज आला आणि तो म्हणत होता, ‘हट ना…सामने से’. त्यानंतर विराट कोहली म्हणाला ये. त्यानंतर यशस्वी जैस्वाल म्हणाला, तो समोर येऊन उभा राहिला होता.

केमार रोचच्या या चेंडूवर विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि नॉन स्ट्राईकवर यशस्वी जैस्वाल उभा होता. यावेळी धाव घेताना केमार रोच आडवा आला होता. त्यामुळे यशस्वीने ही प्रतिक्रिया दिली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहते प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत, विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याचा परिणाम आहे. विराट कोहली हा सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा – IND vs WI: ‘यशस्वीने द्विशतक झळकावले तरी मला आश्चर्य वाटणार नाही’; जैस्वालच्या शतकावर भारताच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

यशस्वी जैस्वालला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली असून त्याने पहिल्याच डावात शतक झळकावले. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात १५० धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसरा दिवस अकेर दोन विकेट गमावून ३१२ धावा केल्या आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे आघाडी १६२ धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल सध्या क्रीजवर असून तो १४३ धावां केल्या आहेत, तर विराट कोहली ३६ धावांवर खेळत आहे. याआधी कर्णधार रोहित शर्माने १०३ धावांची शतकी खेळी करुन बाद झाला.