Yashasvi Jaiswal set a huge record on Test debut against West Indies on foreign soil: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालचे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतक हुकले. या सामन्यात पहिल्या डावात त्याने शानदार फलंदाजी करत दीडशतक पूर्ण केले. त्यानंतर तो १७१ धावांवर बाद झाला. तो ऐतिहासिक कामगिरी करण्यास फक्त २९ धावांनी मुकला. त्याने जर अजून २९ धावा केल्या असत्या, तर तो भारतासाठी पदार्पणात द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला असता.
यशस्वीला अर्थातच द्विशतक झळकावता आले नाही, पण तो परदेशी भूमीवर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो भारतासाठी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या सामन्यात यशस्वी जैस्वालने ३८७ चेंडूंचा सामना करत १७१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एक षटकार आणि १६ चौकार मारले.
यशस्वी जैस्वालने गुंडप्पा विश्वनाथचा मोडला विक्रम –
गुंडप्पा विश्वनाथचा विक्रम मोडून यशस्वी जैस्वाल कसोटी सामन्यात पदार्पणात भारतासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. गुंडप्पा विश्वनाथने १९६९ मध्ये पदार्पणाच्या कसोटी सामन्यात १३७ धावा केल्या होत्या, पण आता यशस्वीने १७१ धावा करत त्याला मागे टाकले आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या बाबतीत शिखर धवन १८७ धावांसह पहिल्या तर रोहित शर्मा १७७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कसोटी पदार्पणात भारतीयाने केलेली सर्वोच्च धावसंख्या –
१८७ धावा – शिखर धवन विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१३)
१७७ धावा – रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडिज (२०१३)
१७१ धावा – यशस्वी जैस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२३)
१३७ धावा – गुंडप्पा विश्वनाथ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९६९)
सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे फलंदाज –
२०१* धावा – ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका) विरुद्ध न्यूझीलंड, कोलंबो सीसीसी, १९८७
२०० – डेव्हॉन कॉनवे (न्यझीलंड) विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, २०२१
१८७ धावा – शिखर धवन (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली, २०१३
१७१ धावा – हॅमिश रदरफोर्ड (न्यूझीलंड) विरुद्ध इंग्लंड, ड्युनेडिन, २०१३
१७१ – यशस्वी जैस्वाल (भारत) विरुद्ध वेस्ट इंडीज, रोसेओ, २०२३