Yashasvi Jaiswal has scored a half-century on his Test debut: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी आणि त्यानंतर आयपीएल २०२३ मधील त्याच्या चमकदार फलंदाजीमुळे यशस्वी जैस्वालला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले. आता त्याने कॅरेबियन भूमीवर पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात आपली योग्यता सिद्ध केली आणि अर्धशतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशस्वीने चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले –

या सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने अल्झारी जोसेफच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने या अर्धशतकासाठी १०१ चेंडूंचा सामना केला. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली आहे. यशस्वीने या डावात अत्यंत संयमाने फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

यशस्वी जैस्वाल भारताचा १३वा सलामीवीर –

जैस्वाल कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा १३वा भारतीय सलामीवीर ठरला आहे. कसोटी पदार्पणात केवळ दोन भारतीय सलामीवीरांनी शतके झळकावली आहेत. सलामीवीर शिखर धवनने २०१३ मध्ये आणि पृथ्वी शॉने २०१८ मध्ये शतक झळकावले होते. एकूण १६ भारतीय फलंदाजांनी कसोटी पदार्पणात शतके झळकावली आहेत, शेवटचे तीन फलंदाज रोहित शर्मा, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांनी केले आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही मुंबईसाठी खेळून आले आहेत. जैस्वाल या यादीत सामील होण्याच्या जवळ आहे.

हेही वाचा – Duleep Trophy final 2023: पृथ्वी शॉने कठीण परिस्थितीत झळकावले अर्धशतक, बराच काळ शांत होती बॅट

वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांची शतकी भागीदारी –

वेस्ट इंडिजच्या भूमीवर १७ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने सलामीवीर फलंदाज म्हणून शतकी भागीदारी केली. गेल्या १७ वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय सलामीवीराने असा पराक्रम केला नव्हता. या सामन्याच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने १०६ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने कोणतेही नुकसान न करता ५५ षटकानंतर बिनबाद १४६ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा ६८ आणि यशस्वी जैस्वाल ६२ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या तुलनेत ४ धावांनी मागे आहे.