अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित ब्रिगेडने वेस्ट इंडीजला ४४ धावांनी मात दिली. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कायरन पोलार्डच्या अनुपस्थितीत निकोलस पुरनने वेस्ट इंडीजची कमान सांभाळली आणि टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अल्झारी जोसेफ आणि ओडियन स्मिथ यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर भारत ५० षटकात ९ बाद २३७ धावांपर्यंत पोहोचू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतकी झुंज दिली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने ९ षटकात अवघ्या १२ धावा देत ४ बळी टिपले. विंडीजचा संघ ४६ षटकात १९३ धावांवर आटोपला. प्रसिध कृष्णाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माचा हा पहिला वनडे मालिकाविजय आहे. मालिकेचा तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे.
वेस्ट इंडीजचा डाव
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी ३२ धावांची सलामी दिली. त्यानंतर रोहितने वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या हातात चेंडू सोपवला. त्याने आपल्या पहिल्या षटकात ब्रँडन किंगला (१८) आणि पुढच्या षटकात डॅरेन ब्राव्होला (१) तंबूत धाडले. विंडीजचे अर्धशतक फलकावर लागल्यानंतर सलामीवीर शाई होप बाद (२७) झाला. भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला झेलबाद केले. होपनंतर आलेला कप्तान निकोलस पूरनही जास्त काही करू शकला नाही. प्रसिध कृष्णाने निकोलस पूरनला रोहितकरवी झेलबाद करत आपला तिसरा बळी घेतला. ७६ धावांत विंडीजने ५ फलंदाज गमावल्यानंतर शमारह ब्रुक्स आणि अकिल होसेनने भागीदारी रचली. ही भागीदारी मोडण्यासाठी रोहितने अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाकडे चेंडू सोपवला. हुडानेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवत ब्रुक्सला झेलबाद करत आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. ब्रुक्सने २ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. त्यानंतर ओडियन स्मिथने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात स्मिथ माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर विराटने स्मिथचा अप्रतिम झेल टिपला. स्मिथने २४ धावा केल्या. ४६व्या षटकात प्रसिध कृष्णाने विंडीजचा शेवटचा फलंदाज केमार रोचला पायचीत पकडले. यासह पाहुण्यांचा डाव ४६ षटकात १९३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून प्रसिध कृष्णाने ९ षटकात अवघ्या १२ धावा देत ४ बळी टिपले. तर शार्दुल ठाकूरला २ बळी मिळाले.
हेही वाचा – IPL 2022 Mega Auction : कधी, कुठे, केव्हा होणार महालिलाव? वाचा एका क्लिकवर!
भारताचा डाव
५० षटकात भारताने ९ बाद २३७ धावा केल्या. केएल राहुलच्या संघातील समावेशामुळे भारताने आज सलामीवीर फलंदाज म्हणून ऋषभ पंतला पाठवले. मात्र रोहित शर्माची ही रणनीती फसली. भारताने रोहित शर्मा (५), ऋषभ पंत (१८) आणि विराट कोहली (१८) यांना स्वस्तात गमावले. त्यानंतर राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी रचली. ३०व्या षटकात राहुल धावबाद झाला. त्याचे अर्धशतक हुकले. राहुलनंतर वॉशिंग्टन सुंदरने सूर्यकुमारसोबत किल्ला लढवला. दरम्यान सूर्यकुमारने आपले दुसरे वनडे अर्धशतक पूर्ण केले. संयमी खेळी केलेला सूर्यकुमार ३९व्या षटकात झेलबाद झाला. त्याला फॅबियन एलनने माघारी धाडले. सूर्यकुमारने ५ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत राहिले. चहल ११ धावांवर नाबाद राहिला वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर केमार रोच, जेसन होल्डर, अकिल होसेन आणि फॅबियन एलन यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.
४६व्या षटकात प्रसिध कृष्णाने विंडीजचा शेवटचा फलंदाज केमार रोचला पायचीत पकडले. यासह पाहुण्यांचा डाव ४६ षटकात १९३ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या वनडेत भारताने विंडीजला ४४ धावांनी मात देत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रसिध कृष्णाने ९ षटकात अवघ्या १२ धावा देत ४ बळी टिपले. तर शार्दुल ठाकूरला २ बळी मिळाले.
मोठा फटका खेळण्याच्या नादात स्मिथ माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर विराटने स्मिथचा अप्रतिम झेल टिपला. स्मिथने २४ धावा केल्या.
४४ षटकात वेस्ट इंडीजने ८ बाद १८९ धावा केल्या. ओडियन स्मिथ भारतासाठी डोकेदुखी ठरत असून तो २ षटकार आणि एका चौकारासह २३ धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडीजला विजयासाठी ३६ चेंडूत ४८ धावांची गरज आहे.
शार्दुल ठाकूरने अकिल होसेनला बाद करत विंडीजच्या विजयाच्या संपुष्टात आणल्या. होसेनने ३४ धावांची झुंज दिली.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने फॅबियल एलनला बाद करत विंडीजचा सातवा धक्का दिला. एलनने होसेनसह ४२ धावांची भागीदारी केली.
शमारह ब्रुक्स आणि अकिल होसेनची भागीदारी मोडण्यासाठी रोहित शर्माने अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाकडे चेंडू सोपवला. हुडानेही रोहितचा विश्वास सार्थ ठरवत ब्रुक्सला झेलबाद केले. ब्रुक्सने २ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा केल्या. ३१ षटकात विंडीजने ६ बाद १२० धावा केल्या.
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने स्फोटक फलंदाज जेसन होल्डरला (२) बाद करत विंडीजचे कंबरडे मो़डले. दीपक हुडाने होल्डरचा झेल घेतला. अकिल होसेन फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. ७६ धावांत विंडीजने ५ फलंदाज गमावले.
प्रसिध कृष्णाने निकोलस पूरनला रोहितकरवी झेलबाद करत आपला तिसरा बळी घेतला. पूरनने ९ धावा केल्या. आता जेसन होल्डर फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.२० षटकात विंडीजने ४ बाद ६६ धावा केल्या.
विंडीजचे अर्धशतक फलकावर लागल्यानंतर सलामीवीर शाई होप बाद (२७) झाला. भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला झेलबाद केले. होपनंतर कप्तान निकोलस पूरन मैदानात आला आहे. १७ षटकात विंडीजने ३ बाद ६१ धावा केल्या.
विकेटच्या शोधात असलेल्या भारतीय संघासाठी प्रसिध कृष्णा धावून आला. त्याने आपल्या पहिल्या षटकात ब्रँडन किंगला (१८) आणि पुढच्या षटकात डॅरेन ब्राव्होला (१) तंबूत धाडले. ९.१ षटकात वेस्ट इंडीजने २ बाद ३८ धावा केल्या. होपची साथ देण्यासाठी शमारह ब्रुक्स मैदानात आला आहे.
वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग यांनी डावाची सुरुवात केली आहे.
५० षटकात भारताने ९ बाद २३७ धावा केल्या. चहल ११ धावांवर नाबाद राहिला वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
२२४ धावांत भारताचे आठ फलंदाज बाद झाले. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने आधी शार्दुल ठाकूर (८) आणि त्यानंतर मोहम्मद सिराजला (३) बाद केले.
अकिल होसेनने भारताला सहावा धक्का दिला. त्याने वॉशिंग्टन सुंदरला (२४) अल्झारी जोसेफकरवी बाद केले. त्याच्यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात आला आहे.
३९व्या षटकात सूर्यकुमार झेलबाद झाला. त्याला फॅबियन एलनने माघारी धाडले. सूर्यकुमारने ५ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. आता दीपक हुडा फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.
३६व्या षटकात सूर्यकुमार यादवने आपले अर्धशतक साजरे केले.
३०व्या षटकात राहुल धावबाद झाला. त्याचे अर्धशतक हुकले. १३४ धावांवर भारताने आपला चौथा फलंदाज गमावला. राहुलनंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला आहे.
सूर्यकुमार आणि राहुलने अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली आहे. २६ षटकात भारताने ३ बाद १०१ धावा केल्या आहेत.
विश्वविजेता अंडर १९ भारतीय संघ स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेत आहे.
भारताची सलामीची रणनीती अपयशी ठरली. रोहितनंतर ऋषभ पंतही सोपा झेल देऊन माघारी परतला. वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने त्याला बाद केले. पंतला १८ धावा करता आल्या. याच षटकात स्मिथने विराटलाही (१८) माघारी धाडले. १२ षटकात भारताने ३ बाद ४३ धावा केल्या. भारताचा डाव सावरण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल मैदानात आले आहेत.
भारताचा कप्तान रोहित शर्मा आज जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. वेगवान गोलंदाज केमार रोचने त्याला वैयक्तिक ५ धावांवर यष्टीपाठी झेलबाद केले. रोहितनंतर विराट कोहली मैदानात आला आहे.
रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे.
वेस्ट इंडीज : शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकिल होसेन, फॅबियन एलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल, प्रसिध कृष्णा.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा गडी राखून आरामात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ अशी हार पत्करल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी आत्मविश्वासाने कामगिरी केली.
एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या १६ सामन्यांपैकी १० सामन्यांत विंडीजला पूर्ण ५० षटके खेळता आली नाहीत. कर्णधार किरॉन पोलार्ड, फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला निकोलस पूरन यांच्यासह सर्वच फलंदाजांनी निराशा केली.