विशाखापट्टणमच्या मैदानावर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज शतकी खेळी करत विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली. रोहितने आपल्या वन-डे कारकिर्दीतलं २८ वं शतक झळकावलं. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने लोकेश राहुलसोबत २२७ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

एका कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सौरव गांगुली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याशी बरोबरी केली आहे. २०१९ वर्षातलं रोहितचं वन-डे क्रिकेटमधलं हे सातवं शतक ठरलं आहे.

२०१७ सालानंतर वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या फलंदाजीत अमुलाग्र बदल झाला आहे. ही आकडेवारीच त्याची साक्ष देते…

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याशी बरोबरी केली आहे.

लोकेश राहुलनेही रोहित शर्माला चांगली साथ दिली. राहुल १०४ चेंडूत १०२ धावा देत माघारी परतला. रोहितने यानंतरही फटकेबाजी केली, मात्र अखेरच्या षटकांमध्ये तो १५९ धावांवर माघारी परतला.

Story img Loader