सलामीवीर रोहित शर्माने विशाखापट्टमच्या मैदानावर धडाकेबाज शतकी खेळी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसं काढली. रोहितने १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांसह १५९ धावा केल्या. रोहित आणि लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३८७ धावांचा पल्ला गाठला.
या शतकी खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पाकिस्तानी संघाने मिळवून केवळ ५ वेळा अशी कामगिरी केली आहे.
Most 150s In Odi
Rohit – 8*
Warner – 6
Sachin – 5
Gayle – 5#INDvWI— CricBeat (@Cric_beat) December 18, 2019
Most individual ODI 150+ scores:
8 Rohit Sharma
5 Pakistan— CricBeat (@Cric_beat) December 18, 2019
दरम्यान विशाखापट्टणमचं मैदान रोहित शर्मासाठी चांगलंच भाग्यवान ठरलं आहे. गेल्या ३ डावांमध्ये रोहितने या मैदानावर शतकी खेळी केली आहे.
Most individual ODI 150+ scores:
8 Rohit Sharma
5 Pakistan— CricBeat (@Cric_beat) December 18, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला.