वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३८७ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने १५९ धावा केल्या.

अवश्य  वाचा – IND vs WI : हिटमॅन = सिक्सर किंग, सलग ३ वर्ष गाजवतोय मैदान

या शतकी खेळीदरम्यान रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला माघारी टाकत, आपण सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज असल्याचं दाखवून दिलं आहे. १९९८ साली सचिन तेंडुलकरने एका कॅलेंडर वर्षात ९ शतकं झळकावली होती.

दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : अख्खं पाकिस्तान एकीकडे आणि ‘हिटमॅन’ एकीकडे…केला नवा पराक्रम

Story img Loader