IND vs WI 2nd ODI Match Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर होत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला आणि दुसरा सामनाही जिंकून त्यांना मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात बराच बदल करण्यात आला आहे. या सामन्यात संजू सॅमसन अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १३वी वनडे मालिका जिंकण्यास टीम इंडिया सज्ज –

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ कॅरेबियन संघावरील गेल्या १७ वर्षांपासूनचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. जर भारताने दुसरी वनडे जिंकली, तर तो विंडीजविरुद्धची सलग १३वी एकदिवसीय मालिका तर जिंकेलच पण २००६-०७ पासून या संघावर आपले वर्चस्व कायम राखू शकेल.

भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला –

या मालिकेतील पहिला सामना भारताने पाच गडी राखून जिंकला होता. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचा संघ ११४ धावांवर गारद झाला होता. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीने युवा खेळाडूंना फलंदाजीसाठी संधी दिली . मात्र, इशान किशनच्या अर्धशतकाशिवाय एकाही फलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रोहित शर्माने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामना संपवला.

हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला का मिळावी संधी? जाणून घ्या दोघांची आकडेवारी

भारताची प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन: ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथानाझ, शाई होप (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 2nd odi updates west indies team has won the toss and decided to bowl vbm
Show comments