India vs West Indies 2nd Test 1st Day Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून २८८ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना नाबाद ८७ धावा केल्या. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने नाबाद ३६ धावा केल्या. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ८० धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, गॅब्रिएल, केमार रोच आणि वॅरिकन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित-यशस्वीची पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी ८४ षटकांत ४ बाद २८८ धावा केल्या. रोहित आणि यशस्वी जैस्वाल संघासाठी सलामीला आले. यादरम्यान यशस्वीने ७४ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला. रोहितने १४३ चेंडूंचा सामना करत ८० धावा केल्या. रोहितच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली.शुबमन गिल काही विशेष करू शकला नाही. तो १० धावा करून बाद झाला. अजिंक्य रहाणे ८ धावा करून बाद झाला.

कोहली-जडेजाची पाचव्या विकेटसाठी नाबाद १०६ धावांची भागीदारी –

विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात शतकी भागीदारी झाली. कोहलीने १६१ चेंडूंचा सामना करत नाबाद ८७ धावा केल्या. त्याने ८ चौकार मारले. जडेजाने ८४ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. त्याने ४ चौकार मारले. कोहली आणि जडेजा यांच्यात २०१ चेंडूत १०६ धावांची भागीदारी झाली. याआधी रोहित आणि यशस्वी यांच्यात शतकी भागीदारीही झाली होती.

हेही वाचा – आशिया कप २०२३ ट्रॉफीचे पाकिस्तानमध्ये अनावरण, ‘या’ दिग्गज खेळाडूंनी लावली हजेरी

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने १३ षटकात ३० धावा देत एक विकेट घेतली. त्याने ३ मेडन ओव्हर्स टाकल्या. वॅरिकनने २५ षटकांत ५५ धावा देत एक विकेट घेतली. गॅब्रिएलने १२ षटकांत ५० धावा देत एक विकेट घेतली. केमार रोचने १३ षटकांत ६४ धावा देत एक विकेट घेतली. याशिवाय इतरा एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.