Ajinkya Rahane taking an amazing catch of Jermaine Blackwood : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी भारताला कडवी झुंज दिली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर टीम इंडियाने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले. अजिंक्य रहाणेने जर्मेन ब्लॅकवूडचा अप्रतिम झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अजिंक्य रहाणेने घेतला अप्रतिम झेल –

या मालिकेत अजिंक्य रहाणेची तळपलेली पाहिला मिळाली नाही, पण या खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना अप्रतिम झेल पकडत सामन्यात आपले योगदान दिले. वेस्ट इंडिजचा फलंदाज जर्मेन ब्लॅकवुड ८७ व्या षटकात क्रीजवर खेळत होता. तेव्हा रवींद्र जडेजाच्या षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्लॅकवूडने बचावत्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू ब्लॅकवूडच्या बॅटची काठाला लागला आणि मागे गेला.

बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू मागे उभ्या असलेल्या यष्टिरक्षक इशान किशनच्या ग्लोव्हजला लागला. हा झेल टिपण्यात इशान अपयशी ठरला. मात्र यादरम्यान स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेने चपळाईने डायव्हिंग करत झेल पकडला. रहाणेच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकडून कडवी झुंज –

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने ५ विकेट गमावत २२९ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे वेस्ट इंडिज भारतापेक्षा २०९ धावांनी मागे आहे. वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथांजे आणि जेसन होल्डर नाबाद परतले. अॅलिक एथंजे १११ चेंडूत ३७ धावा खेळत आहे, तर जेसन होल्डर ३९ चेंडूत ११ धावा करून नाबाद आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ६५ चेंडूत २१ धावांची भागीदारी झाली.

कर्णधार क्रेग ब्रॅथवेटची सर्वाधिक ७५ धावांची खेळी –

वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी १ बाद ८६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने २३५ चेंडूत सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट रवी अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्क मॅकेन्झीने ५७ चेंडूत ३२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार लगावला. मुकेश कुमारने कर्क मॅकेन्झीला आपला शिकार बनवले.

भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी –

जर्मेन ब्लॅकवूडने ९३ चेंडूत २० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत २ चौकार मारले. जर्मेन ब्लॅकवुडला रवींद्र जडेजाने बाद केले. जर्मेन ब्लॅकवुडनंतर जोशुआ दा सिल्वाने २६ चेंडूत १० धावा केल्या. जोशुआ दा सिल्वाला मोहम्मद सिराजने बाद केले. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे, तर रवींद्र जडेजाने आतापर्यंत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराज, रवी अश्विन आणि मुकेश कुमार यांना १-१ विकेट मिळाली.

Story img Loader