Anushka’s Insta Story Viral After Virat Kohli’s Century: त्रिनिदाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दुसरी कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने विक्रमी शतक झळकावले. विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७६वे शतक होते. कोहलीच्या शतकावर पत्नी अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली. शतकानंतर मैदानावर कोहलीने लग्नाच्या अंगठीचे चुंबन घेतले. यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीचा फोटोसह इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनुष्का शर्माची इन्स्टाग्रामवर स्टोरी व्हायरल –
विराट कोहलीने त्रिनिदाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १८० चेंडूत आपले २९वे शतक पूर्ण केले. त्याने २०६ चेंडूंचा सामना करताना ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. शतकानंतर कोहलीला सहकारी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. यानंतर विराट कोहलीने गळ्यात घातलेली लग्नाची अंगठी काढून तिचे चुंबन घेतले. कोहलीच्या शतकावर पत्नी अनुष्काने प्रतिक्रिया दिली. अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोहलीचा फोटो शेअर केला आणि हार्ट इमोजी बनवला. तिची ही स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
विशेष म्हणजे या शतकाच्या जोरावर कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. कारकिर्दीतील ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध १२वे शतक झळकावले. ५०० व्या कसोटीपर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने सचिनला मागे टाकले. सचिनने ५०० सामन्यांमध्ये ७५ शतके ठोकली होती. तर कोहलीने ७६ शतके झळकावली आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे तर, वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाचा पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला, ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून १२१ धावांची खेळी पाहिला मिळाली.यानंतर जडेजाने कसोटी कारकिर्दीतील १९वे अर्धशतकही झळकावले. कोहली दुर्दैवाने धावबाद झाला. त्याचवेळी जडेजालाही अर्धशतकाचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तो १५२ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला.
हेही वाचा – Virat Kohli : “माझ्यासाठी विक्रम आणि टप्पे महत्त्वाचे नाहीत, तर…”; शतकानंतर विराट काय म्हणाला? घ्या जाणून
कोहली आणि जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक झळकावले. तो ८ चौकारांच्या मदतीने ७८ चेंडूंत ५६ धावा करून बाद झाला. तत्पुर्वी पहिल्या दिवशी रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ धावांचे योगदान दिले. रॉच आणि वॅरिकन यांच्याशिवाय वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने दोन बळी घेतले. त्याचवेळी शॅनन गॅब्रिएलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.