भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध जमैका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने भेदक मारा करत विंडीजच्या डावाला खिंडार पाडलं आहे. या खेळीदरम्यान बुमराहने हॅटट्रीकचीही नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा बुमराह तिसरा भारतीय गोलंदज ठरला आहे. याआधी हरभजन सिंहने २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध, इरफान पठाणने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हॅटट्रीक नोंदवली होती. बुमराहने विंडीजच्या पहिल्या डावात ब्राव्हो, ब्रुक्स आणि रोस्टन चेस या फलंदाजांना माघारी धाडत हा बहुमान मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विंडीजची अवस्था ८७/७ अशी दयनीय झाली होती. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे अजुनही ३२९ धावांची आघाडी आहे, त्यामुळे जमैका कसोटी डावाने जिंकण्याची चांगली संधी विराट कोहलीच्या भारतीय संघाकडे असणार आहे. याचसोबत आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीकची नोंद करणारा बुमराह दुसरा गोलंदाज ठरला आहे.

त्याआधी, दुसऱ्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. यानंतर जाडेजा-विहारी यांची छोटेखानी भागीदारीही कॉर्नवॉलने तोडली. यानंतर मैदानात आलेल्या इशांत शर्माने हनुमा विहारीची उत्तम साथ देत भारताला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. दोन्ही फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक तर इशांत शर्माने पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. हनुमा विहारीने १११ तर इशांत शर्माने ५७ धावांची खेळी केली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर, भारताचे तळातले फलंदाज फारसा प्रतिकार करु शकले नाहीत.

प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत, यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. मधल्या फळीत शेमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी विंडीजचे फलंदाज फॉलोऑन किती वेळ टाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.