Rain interrupted play on the fifth day: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. या सामन्याचता आज पाचवा दिवस आहे. मात्र अद्याप सामन्याला सुरुवात झालेली नाही. भारतीय संघाने आपला दुसरा डाव २ बाद १८१ धावा करून दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर ३२ षटकांत २ बाद ७६ धावा केल्या आहेत. त्यांना अजून २८९ धावांची गरज आहे.
सामना कधी सुरू होईल?
क्रिकेट चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू होऊ शकला नाही. याबाबत बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हवामानाचे ताजे अपडेट सांगण्यात आले आहे. तसेच एक फोटोही शेअर केला आहे. स्टेडियमवर ढग दाटून आल्याचे या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय पावसाची संततधार सुरू आहे.
वेस्ट इंडिजचे फलंदाज सामना जिंकण्यासाठी खेळतील का?
कॅरेबियन फलंदाज सामना जिंकण्यासाठी पुढे जातील की अंतिम दिवशी अनिर्णितसाठी खेळतील? मात्र, चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहता क्रेग ब्रॅथवेटचा संघ अनिर्णीतसाठी खेळत असल्याचे मानले जात आहे. मात्र, पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ कोणत्या मानसिकतेने मैदानात उतरणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. त्याचवेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना विजयासाठी ८ विकेट्स घ्याव्या लागतील. याशिवाय हवामान सहकार्य करेल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
६७ षटकांचा खेळ होऊ शकतो –
पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर पाऊस थांबला आहे. कव्हर्स काढण्यात आली असून मैदान कोरडे करण्याचे काम सुरू आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज पाचवा दिवस आहे. वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते, त्यापैकी २ गडी गमावून ७६ धावा केल्या आहेत. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी २८९ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज आहे. पावसामुळे पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ पूर्णपणे वाया गेला. त्यानंतर पंचांनीही लंच ब्रेकची घोषणा केली. आता दुसऱ्या सत्राचा खेळ साडेअकरा वाजता सुरू होईल. जर सर्व काही ठीक झाले आणि पाऊस पडला नाही, तर आता सुमारे ६७ षटकांचा खेळ होऊ शकतो.