Mukesh Kumar’s Reaction to Kohli’s Hug: पोर्ट-ऑफ-स्पेन येथे सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य दिले आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने २ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत. पण यादरम्यान मुकेश कुमारला दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर मुकेश कुमारने सांगितले की, जेव्हा त्याला विराट कोहलीने मिठी मारली, तेव्हा त्याच्या भावना काय होत्या?
ज्याने विराट कोहलीचे मैदानावरील कारनामे इतकी वर्षे टीव्हीवर पाहिले होते. आता त्याच भारताच्या माजी कर्णधाराने त्याला पहिल्या विकेटनंतर मिठी मारली, मुकेश कुमारसाठी हे स्वप्न सत्यात उतरल्यासाखे होते. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील मुकेश कुमार, ज्याने त्याच्या ३० व्या वाढदिवसाच्या काही महिन्यांपूर्वी कसोटी पदार्पण केले होते. तो गेल्या सात वर्षांत बंगालच्या अंडर-२३ आणि भारत अ संघाकडून खेळला आहे.
बीसीसीआय टीव्हीवर मोहम्मद सिराजशी झालेल्या संभाषणात तो म्हणाला, “जेव्हा मी विकेट घेतली तेव्हा विराट भैया धावत आला आणि मला मिठी मारली. त्यावेळी मी दुसऱ्या जगात गेलो. ज्या व्यक्तीला मी इतकी वर्षे टीव्हीवर पाहत होतो, त्याने मला मिठी मारली. तो एक अद्भुत अनुभव होता.” मुकेश कुमार पुढे म्हणाला, ”तुम्ही आणि जेडी (उनाडकट) भाई गोलंदाजी करत असताना रोहित भाई म्हणाले होते की, या खेळपट्टीवर लगेच विकेट मिळणार नाहीत. कठोर परिश्रम करावे लागतील.” मानसिकदृष्ट्या तो तयार झाला होता, परंतु सामन्याच्या एक दिवस आधी संघाच्या बैठकीत त्याला पदार्पणाबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्याला थोडा वेळ लागला.
मुकेश कुमार म्हणाला, “मी खरोखर खेळत असल्याचे कळल्यावर स्तब्धच झालो. मी नेहमी खेळायला तयार होतो आणि म्हणूनच मी टीम मीटिंगला गेलो होतो. मला वाटत होते की कदाचित संधी मिळेल मी खेळून किंवा न खेळो, मी सदैव तयार असतो.” ही बातमी ऐकून मुकेश कुमारची आई भावूक झाली. त्याचबरोबर त्याच्या प्रवासाशी संबंधित असलेले सर्वजण खूप आनंदी झाले.
हेही वाचा – IND vs WI 2nd Test : चंद्रपॉलांची ‘पिढी’ बदलली तरी वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध जिंकण्याचा फॉर्म्युला गवसेना…
मुकेश कुमारने मोहम्मद सिराजला सांगितले की, “इथे सकाळ होती आणि भारतात संध्याकाळ होत होती. संध्याकाळी हॉटेलवर पोहोचल्यावर आईशी बोललो. मी म्हणालो, आई मी देशासाठी खेळतोय. माझे सर्व नातेवाईक देखील खूप आनंदी झाले, ज्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिली.”