India vs West Indies 2nd Test 2nd Day: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करतान आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४३८ धावा. या सामन्यात विराट कोहली पाठोपाठ रविंचंद्रन आश्विन देखील अश्विन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने आपल्या बॅटने एक पराक्रम केला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जडेजाच्या महत्त्वपूर्ण विकेट पडल्यानंतर आश्विनने भारतीय संघाचा डाव सावरला. या दरम्यान रविचंद्रन आश्विनने ५६ धावांची खेळी केली. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविचंद्रन आश्विन सहाव्या क्रमांकाच्या खाली फलंदाजी करताना भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याने या बाबतीत अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला मागे टाकले आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणने सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३१०८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनच्या आता ३१८५ धावा झाल्या आहेत. या यादीत कपिल देव यांच्या नावावर ५११६ धावा आहेत. एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसरे स्थान मिळविल्यानंतर अश्विन हा धोनी आणि कपिल देव यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – IND vs WI 2nd Test : ‘आई, मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली’; पदार्पणाची बातमी देताना मुकेश कुमार भावूक
रविंचंद्रन अश्विनची कसोटी कारकीर्द –
आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत फलंदाजीत करताना १३२ डावांमध्ये २७.२२ च्या सरासरीने ३१८५ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने ५ शतके आणि १४ अर्धशतकेही झळकावली आहेत. गोलंदाजीत त्याने १७६ डावात २३.६१ च्या सरासरीने ४८६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३४ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो भारतासाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
हेही वाचा – IND vs WI 2nd Test: विराट कोहलीला भेटल्यानंतर ‘या’ खेळाडूच्या आईला अश्रू अनावर, VIDEO होतोय व्हायरल
सामन्याबद्दल बोलायचे तर, वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाचा पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला, ज्यामध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून १२१ धावांची खेळी पाहिला मिळाली. त्याने २०६ चेंडूचा सामना करताना ११ चौकार लगावले. तसेच कर्णधार रोहित शर्माने ८०, रवींद्र जडेजाने ६१, तर यशस्वीने ५७ आणि अश्विनने ५६ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा वेस्ट इंडिज संघानेही १ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या.