India vs West Indies 2nd Test 1st Day Updates: गुरुवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांत दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल आपापले अर्धशतक पूर्ण करून परतले. त्याचवेळी जेव्हा टीम इंडियाने लंचनंतर बॅटिंगला सुरुवात केली, तेव्हा टीमचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका मोठ्या विक्रमासह मागे टाकले आहे.

रोहितने धोनी-सेहवागला मागे टाकले –

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. यासह रोहितच्या नावावर आता १७२९८ धावा झाल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १७२६६ धावांसह महेंद्रसिंग धोनी आणि १७२५३ धावांसह वीरेंद्र सेहवागला मागे टाकले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन-विराट आघाडीवर –

भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिनच्या नावावर ३४३५७ धावा आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाने सचिनपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या नाहीत. विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने भारतासाठी २५४०० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तिसरे नाव राहुल द्रविडचे (२४०६४ धावा) आहे. याशिवाय सौरव गांगुली १८४३३ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ENG vs AUS 4th Test: मोईन अलीनंतर जॅक क्रॉलीने रचला इतिहास; दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई

रोहित शर्माने डब्ल्यूटीसी दोन हजार धावांचा टप्पा पार केला –

रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात २००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितपूर्वी इतर कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम केला नाही. या सामन्यापूर्वी रोहितने २४ कसोटीत ५२.८३ च्या सरासरीने १९५५ धावा केल्या होत्या. पण उपाहारापूर्वी रोहित ६३ धावांवर नाबाद माघारी परतला होता, यासह त्याने २००० धावांचा टप्पा ओलांडला.

Story img Loader