Virat Kohli responded to the critics by scoring a century in his 500th match: भारतीय फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ७६ वे शतक होते. तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोहलीने परदेशी भूमीवर शतक झळकावले. जवळपास ५५ महिन्यांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली. या शतकानंतर कोहलीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवश २०६ चेंडूचा सामना करताना १२१ धावांची खेळी साकारली. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार लगावले. तसेच या शतकाच्या जोरावर विराट कोहली आपल्या ५००व्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराटने यापूर्वी २०१८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पर्थ कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.

तसेच आता विराटने शतकाच्या जोरावर त्याचबरोबर अनेक विक्रमांची नोंद केली आहे. शतक झळकावल्यानंतर विराटने पुन्हा एकदा टीकाकारांवर निशाणा साधला. विक्रमी खेळी खेळल्यानंतर त्याने सांगितले की, या विक्रम आणि कामगिरीचा त्याला फारसा फरक पडत नाही. कारण त्याला फक्त संघाच्या विजयात हातभार लावायचा आहे.

संघाच्या विजयात तुम्ही कसे योगदान देता हे अधिक महत्त्वाचे –

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, “मला फक्त संघासाठी योगदान द्यायचे आहे. जर मी ५० धावा केल्या असत्या, तर माझे शतक हुकले असते आणि जर मी १२० धावा केल्या असत्या, तर माझे द्विशतक शतक हुकले असते. अशा परिस्थितीत हे आकडे आणि टप्पे माझ्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत. संघाच्या विजयात तुम्ही कसे योगदान देता हे अधिक महत्त्वाचे आहे.”

मी अनेक वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या –

पाच वर्षांनंतर मायदेशाबाहेर शतक ठोकण्याच्या प्रश्नावर विराट म्हणाला, “या फक्त इतरांशी बोलण्याच्या गोष्टी आहेत. मी घरापासून दूर १५ शतके झळकावली आहेत आणि हा काही वाईट रेकॉर्ड नाही. पण मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी मी माझे सर्वोत्तम दिले आहे. आम्ही मायदेशाबाहेर दूर ३० सामनेही खेळलो नाही आणि या काळात मी अनेक वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.”

हेही वाचा – IND vs WI 2nd Test : ‘आई, मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली’; पदार्पणाची बातमी देताना मुकेश कुमार भावूक

फिटनेस सर्वात महत्त्वाची गोष्ट –

विराट पुढे म्हणाला, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस, ज्यामुळे मला सतत चांगले बनण्यास मदत होते. देशासाठी ५०० सामने खेळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी माझ्या मेहनतीने हे सर्व साध्य करू शकलो. इथपर्यंत पोहोचण्याचा विचार कधीच केला नव्हता.”