India vs West Indies 2nd Test 1st Day: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताने ४ विकेट गमावून २८८ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले. यासह त्याने शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना मागे टाकले. जैस्वाल अवघ्या २१ वर्षांचा असून त्याने अवघ्या दोन डावात शानदार कामगिरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वीने दुसऱ्या डावात झळकावले अर्धशतक –

यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याने १७१ धावांची खेळी केली होती. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना मोठ्या फरकाने जिंकण्यात यश आले. आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने ५७ धावा केल्या. अशा प्रकारे त्याच्या पहिल्या दोन डावात २२८ धावा झाल्या आहेत. त्याने शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना मागे टाकले आहे. पहिल्या दोन डावात धवनने २१० तर पृथ्वीने २०४ धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमधील पहिल्या दोन डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:

२८८ धावा – रोहित शर्मा (१७७, १११*)
२६७ धावा – सौरव गांगुली (१३२, १३६)
२२८ धावा – यशस्वी जैस्वाल (१७१,५७)
२१० धावा – शिखर धवन (१८७, २३)
२०४ धावा – पृथ्वी शॉ (१३४, ७०)

हेही वाचा – IND vs WI: ‘ते एक दिग्गज आहेत आणि त्यांच्यासह फलंदाजी करणे…’, विराट कोहलीबद्दल यशस्वी जैस्वालची प्रतिक्रिया

यशस्वी आणि रोहित-यशस्वीने आर्थन-स्टीवर्ट यांना मागे टाकले –

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रोहित आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. यानंतर, या मैदानावर परदेशी सलामी जोडी म्हणून सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्या जोडीच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. रोहित आणि यशस्वी यांनी माईक आर्थटन आणि अॅलेक स्टीवर्टला मागे टाकले, ज्यांनी १९९८ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये परदेशी सलामी जोडी म्हणून पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली होती. या यादीत पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचे जेफ्री बॉयकॉट आणि डेनिस एमिस यांचा आहे, ज्यांनी १९७४ मध्ये पहिल्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा – Manipur Violence : ‘आरोपींना फाशी दिली नाही, तर आपण…’; मणिपूरमधील घटनेवर हरभजन सिंगने व्यक्त केला संताप

पोर्ट ऑफ स्पेन येथे परदेशी सलामीच्या जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी –

२०९ धावा – जेफ्री बॉयकॉट आणि डेनिस एमिस (इंग्लंड, १९७४)
१९१ धावा – आर्थर मॉरिस आणि कॉलिन मॅकडोनाल्ड (ऑस्ट्रेलिया, १९५५)
१३९ धावा – रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (भारत, २०२३)
१२९ धावा – मायकेल अथर्टन आणि अॅलेक स्टीवर्ट (इंग्लंड, १९९८)
१२३ धावा – सादिक मोहम्मद आणि माजिद खान (पाकिस्तान, १९७७)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 2nd test yashasvi jaiswal surpasses prithvi shaw to break shikhar dhawans record vbm