India vs West Indies target 351: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटी वनडे सामना खेळला जात आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट गमावत ३५१ धावा केल्या. या डावात भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. शुभमन गिलने सर्वाधिक ८५ धावांचे योगदान दिले. इशान किशनने ७७, हार्दिक पांड्याने नाबाद ७० आणि संजू सॅमसनने ५१ धावा केल्या. सूर्यकुमार यादव 35 धावा करून बाद झाला. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने दोन बळी घेतले. अल्झारी जोसेप, गुडाकेश मोती आणि यानिक कारिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, मोतीशिवाय वेस्ट इंडिजचे सर्व गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी –

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल आणि इशान किशन यांनी पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ही सर्वोच्च सलामीची भागीदारी आहे. या दोघांनी २०१७ मध्ये धवन आणि रहाणेचा विक्रम मोडला. किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. फिरकीपटू कारियाविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ७७ धावांवर यष्टिचित झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजने आठ धावा केल्या, मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी केली. तो ४१ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IND vs WI 3rd ODI: इशान किशन आणि शुबमन गिलने रचला विक्रम! रहाणे-धवनला ‘या’ बाबतीत टाकले मागे

फिनिशरच्या भूमिकेत चमकला हार्दिक पांड्या –

अर्धशतक झळकावल्यानंतर शुभमन गिल क्रीजवर राहिला आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण ८५ धावांच्या स्कोअरवर तो गुडाकेश मोतीच्या असामान्य बाऊन्सरने झेलबाद झाला. यानंतर कर्णधार हार्दिकसह सूर्यकुमारने भारताचा डाव पुढे नेला. सूर्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३५ धावांवर बाद झाला. अखेरीस, हार्दिकने वेगवान धावा केल्या आणि ५२ चेंडूत ७० धावा करून नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि पाच षटकार मारले. अखेरीस भारतीय संघाने पाच गडी गमावून ३५१ धावा केल्या.