विंडीजविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत हाराकिरी केली. विंडीज फलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत शंभरपेक्षा जास्त धावा कुटत भारताला विजयासाठी ३१६ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

रोहित शर्माने यादरम्यान आपलं अर्धशतकही झळकावलं. ६३ चेंडूत रोहितने ६३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत रोहितने ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यादरम्यान वन-डे क्रिकेटमध्ये २०१९ सालात सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित अव्वल स्थानी कायम राहिला आहे.

याचसोबत सलामीवीर या नात्याने रोहित शर्माची एका कॅलेंडर वर्षातलं हे २० वं अर्धशतक ठरलं. (तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये) या निकषामध्ये रोहितने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांचा विक्रम मोडला.

रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. ६३ धावा काढून रोहित जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत

Story img Loader