भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी (IND vs WI 3rd T20I) चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०,००० प्रेक्षकांना प्रवेश दिला आहे. भारतीय संघाने पहिला सामना ६ विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुमच्या विनंतीनंतर आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला”, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रमुख अविशेक दालमिया यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – IND vs WI : “दात दाखवू नकोस…”, रोहितनं पुन्हा एकदा चहलला केलं ट्रोल; पाहा VIRAL VIDEO

दालमिया म्हणाले, ”आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. यामुळे कॅबला आजीवन सहकारी, वार्षिक आणि मानद सदस्यांप्रती आपली जबाबदारी पार पाडता येईल.” याआधी गांगुलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, खेळाडूंच्या आरोग्याला कोणताही धोका टाळण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. दालमिया यांनी ७० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती केली होती.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेतील पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये, जवळपास २००० प्रेक्षकांना कॉर्पोरेट बॉक्स आणि डॉ. बीसी रॉय क्लबहाऊसच्या वरच्या वर्गात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.