भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची हाराकिरी सुरुच आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहित शर्मा ७१ धावांची खेळी करुन माघारी परतल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा ऋषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला.

मात्र ऋषभ आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात पुरता अपयशी ठरला. पोलार्डच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत एकही धाव न काढता जेसन होल्डरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. यादरम्यान आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रमही पंतच्या नावे जमा झाला आहे.

त्याआधी रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या जोडीने भारताला पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करुन दिली. रोहित शर्मा ७१ धावा काढून माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

Story img Loader