रोहित शर्माने विंडीजविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमधली खराब कामगिरीला मागे टाकत दमदार पुनरागमन केलं आहे. वानखेडे मैदानावरील अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला. या विक्रमी कामगिरीदरम्यान रोहितने ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत.

मात्र सर्वात कमी डावांमध्ये ४०० षटकारांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीला मागे टाकलं आहे. रोहितने आपल्या ३६० व्या डावात ही कामगिरी केली आहे, तर शाहिद आफ्रिदीला या कामगिरीसाठी ४३७ डाव लागले होते.

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत ८ षटकांच्या आतच भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

Story img Loader