According to Dinesh Karthik Rohit Sharma will not change the playing eleven for the second Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून क्वीन्स पार्कवर सुरू होत आहे. टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी भारतीय प्लेइंग इलेव्हनची चर्चा होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा काही बदलांसह क्वीन्स पार्कवर उतरू शकतो, असे मानले जात आहे. मुकेश कुमार आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावर आता भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा बदलणार नाही – दिनेश कार्तिक

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिकने सांगितले की, रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. कार्तिक म्हणाला की, टीम इंडिया शेवटच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसोबत खेळू शकते. कार्तिकच्या मते, अश्विन-जडेजा जोडीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, जोपर्यंत कोणी खराब कामगिरी करत नाही, तोपर्यंत बदल होण्याची शक्यता कमी आहे.

खेळाडूंना पाच दिवसांचा ब्रेक मिळाला आहे – कार्तिक

दिनेश कार्तिकने सांगितले की, संघातील बदलाची संधीही कमी आहे. कारण सर्व खेळाडूंना आधीच पाच दिवसांचा ब्रेक मिळाला आहे आणि या ब्रेकमध्ये खेळाडूंनी सरावासह कॅरेबियन समुद्रकिनाऱ्यावर चांगला वेळ घालवला आहे. खेळाडूंनी पहिले २-३ दिवस एन्जॉय केले आणि शेवटचे दोन दिवस नेटमध्ये चांगला सराव केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी तीन दिवसात संपली होती. भारताने विंडीजचा एक डाव आणि १४१ धावांनी मोठा पराभव केला होता.

हेही वाचा – IND A vs PAK A: कोण आहे साई सुदर्शन? ज्याने पाकिस्तानविरुद्ध झळकावले शानदार शतक

आतापर्यंत कोणत्या संघाचे पारडे जड?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत झालेल्या ९९ कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ पुढे आहे. वेस्ट इंडिजने भारतापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. वेस्ट इंडिजने ९९ कसोटीत २० सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाला केवळ २३ सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर या दोघांमधील ४६ कसोटी सामने अनिर्णित राहिल्या आहेत. या दोघांमधील १०० वा आणि मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे होणार आहे.

विराट कोहली ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी उतरणार मैदानात –

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या माध्यमातून कोहली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५०० सामने खेळणारा १०वा खेळाडू ठरणार आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

दिनेश कार्तिकची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.