Akash Chopra said that even if Yashasvi Jaiswal scores that 200 I will not be too surprised: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात डॉमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने दुसऱ्या दिवशी भारतासाठी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याच्याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही बऱ्याच कालावधीनंतर कसोटीत शतक झळकावले.
या दोन्ही खेळाडूंच्या शानदार खेळीमुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचू शकला. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकी खेळीवर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले मत मांडले आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्रानेही यशस्वी जैस्वालबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
शतकाचे द्विशतकात रूपांतर कसे करायचे हे यशस्वी जैस्वालला माहीत आहे – आकाश चोप्रा
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाले की, “सर्वप्रथम यशस्वी जैस्वाल आणि त्याच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल बोलूया. तो आधीच १४३ धावांवर फलंदाजी करत आहे आणि त्याने २०० धावा केल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण खेळाडूला शतकांचे द्विशतकात रूपांतर कसे करायचे हे माहित आहे.”
आपले बोलणे पुढे चालू ठेवत तो पुढे म्हणाला की, “यशस्वीने आपल्या खेळाच्या दोन्ही बाजू दाखवून दिल्या. अर्थात तो जोखीम पत्करू शकतो, तो आपल्या पायांचा वापर शकतो, रिव्हर्स स्वीप खेळू शकतो, त्याच्याकडे ते करण्याची ताकद आहे, परंतु तो स्वत: ला वेळ देऊ शकतो आणि जास्त काळ विकेटवर राहू शकतो. त्यामुळे या खेळाडूला रेट्रो कसोटी क्रिकेट कसे खेळायचे हे देखील माहीत आहे.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “यशस्वी जैस्वालबद्दल आपल्याला आणखी काय माहिती आहे? रिव्हर्स स्वीप त्याला परिभाषित करू शकतो किंवा तो जिथे बचाव करत होता. तो स्वत: ला वेळ देत होता. खरे तर मला असे वाटते की, आधुनिक क्रिकेट त्याच्या डीएनएमध्ये असून मोठे शॉट्स खेळणे, जोखीम घेणे, तो अपारंपरिक शॉट्स सहज खेळत आहे. त्यामुळे तो रिव्हर्स स्वीप निश्चितपणे त्याची मानसिकता दर्शवतो, परंतु दुसऱ्या दिवसाच्या खेळाने मला दाखवून दिले की तो दीर्घकाळासाठी आशावादी असू शकतो.”