Tagenarine Chanderpaul vs Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांना बुधवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत दोन विकेट्स घेत मोठा विक्रम केला. तागेनारायण चंद्रपॉलला बाद करून त्याने इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील बाप व मुलाला बाद करणारा आर अश्विन पाचवा गोलंदाज ठरला.

अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटलाही बाद केले. त्याने तागेनारायणला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर ब्रॅथवेटला कर्णधार रोहित शर्माने झेलबाद केले. तेजनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. अश्विननेही त्याच्याविरुद्ध खेळून त्याला चार वेळा बाद केले आहे. अश्विनने २०११ आणि २०१३ मध्ये चंद्रपॉलला आठ डावांत चार वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!

अश्विनने मोठी कामगिरी केली

रविचंद्रन अश्विनने चंद्रपॉलनंतर आता त्याचा मुललाही बाद केले आहे. आर अश्विनने विंडीजविरुद्धच्या सामन्यात शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल या बाप-बेटा जोडीला बाद केले आहे. वडिलांनंतर आपल्या मुलाला कसोटीत बाद करणारा अश्विन हा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारा अश्विन हा जगातील पाचवा खेळाडू आहे. इंग्लंडच्या इयान बॉथम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स, पाकिस्तानच्या वसीम अक्रम यांनी लान्स क्रेन्स व ख्रिस क्रेन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, दक्षिण आफ्रिकेच्या सिमॉन हार्मर यांनी शिवनारायण व तागेनारायण चंद्रपॉल यांची विकेट घेतली आहे.

हेही वाचा: IND vs WI 1st Test: अश्विनच्या फिरकीसमोर वेस्ट इंडीजची पळताभुई! यजमानांना १५० धावांत गुंडाळले, पहिल्या दिवस अखेर भारत वरचढ

विराट सचिनच्या खास क्लबमध्ये सामील झाला

कोहलीने परदेशी भूमीवर पिता-पुत्र जोडीचा सामना करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. सचिन तेंडुलकरने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. ३४ वर्षीय कोहलीने २०११ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर दिग्गज शिवनारायण चंद्रपॉलचा सामना केला होता. आता विराट पहिल्या कसोटीत चंद्रपॉलचा मुलगा तागेनारायणविरुद्ध मैदानात उतरला आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात ज्योफ मार्श आणि त्याचा मुलगा शॉन मार्श यांचा सामना केला. तेंडुलकर १९९२च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ज्योफ मार्शविरुद्ध खेळला होता. २०१०-११ मध्ये सचिन त्याचा मुलगा शॉन मार्शविरुद्ध ऑस्ट्रेलियात उतरला होता.

Story img Loader