Tagenarine Chanderpaul vs Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांना बुधवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत दोन विकेट्स घेत मोठा विक्रम केला. तागेनारायण चंद्रपॉलला बाद करून त्याने इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील बाप व मुलाला बाद करणारा आर अश्विन पाचवा गोलंदाज ठरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in