Brian Lara At West Indies Camp: आयसीसी विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर भारताचा सामना करणार आहे. १२ जुलैपासून दोन्ही संघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटीशिवाय तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी२० मालिकाही खेळणार आहे. माजी दिग्गज ब्रायन लारा निराशाजनक विश्वचषक पात्रता फेरीनंतर वेस्ट इंडिज संघात सामील झाला आहे.
वास्तविक, ब्रायन लारा कॅरेबियन संघाशी परफॉर्मन्स मेंटॉर म्हणून काम करणार आहे. अलीकडच्या काळातील वेस्ट इंडिजची कामगिरी अतिशय लाजिरवाणी झाली आहे. दोन वेळा वर्ल्डकप चॅम्पियन असूनही वेस्ट इंडिज वन डे विश्वचषकाचा भाग नसण्याची ४८ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत ब्रायन लारा संघात आल्यानंतर त्यांच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. हे येणार्या काळातच कळेल, पण सध्या वेस्ट इंडिजचा संघ वाईट टप्प्यातून जात आहे.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत ब्रायन लारा वेस्ट इंडिज टीमसोबत दिसत आहे. पण ब्रायन लाराच्या जोडीनंतर कॅरेबियन संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल का? खरे तर हे भविष्यात कळेलच. मात्र, गेल्या काही दिवसांत झिम्बाब्वेमध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा संघ स्कॉटलंडविरुद्ध पराभूत होऊन पात्रता फेरीपासून वंचित राहिला. २०२३ मध्ये वेस्ट इंडिजचा मुख्य विश्वचषकात सहभाग नसेल. अशा स्थितीत लाराची सध्याच्या वेस्ट इंडिज संघाशी असलेली साथ निश्चितच मोठी मदत होईल. लारा आता उद्ध्वस्त झालेल्या वेस्ट इंडिज संघाला संजीवनी देण्याचे काम करेल.
भारत-वेस्ट इंडिज वेळापत्रक
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ २७ जुलैपासून वन डे मालिकेत भिडणार आहेत. दुसरी वन डे २९ जुलैला आणि तिसरी वन डे १ ऑगस्टला खेळवली जाईल. कसोटी आणि वन डेनंतर टी२० मालिका सुरू होईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मधील पहिला सामना ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. दुसरा सामना ६ ऑगस्टला, तिसरा सामना ८ ऑगस्टला आणि चौथा टी२० सामना १२ ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यातील शेवटचा टी२० सामना १३ ऑगस्ट रोजी होणार आहे.