वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने वन-डे क्रिकेटच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर भारताविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ख्रिस गेलचा ३०० वा वन-डे सामना ठरला आहे. याआधी कोणत्याही वेस्ट इंडिजच्या खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाहीये. माजी विंडीज कर्णधार ब्रायन लाराने २९९ वन-डे सामने खेळले आहेत. त्यामुळे ३०० वन-डे सामने खेळणारा गेल पहिला विंडीज फलंदाज ठरला आहे.

भारताविरुद्धची वन-डे मालिका गेलची अखेरची मालिका असणार आहे. भारताविरुद्ध मालिकेसाठी गेलने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे या मालिकेत ख्रिस गेल आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेर कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader