भारताविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलला अखेरीस सूर सापडला आहे. ख्रिसने ४१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७२ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने शाहिद आफ्रिदी, रोहित शर्मा यांना मागे टाकलं आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेल दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –
- एबी डिव्हीलियर्स – ५८ षटकार (२०१५)
- ख्रिस गेल – ५६ षटकार (२०१९*)
- शाहिद आफ्रिदी – ४८ षटकार (२००२)
- रोहित शर्मा – ४६ षटकार (२०१७)
पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सामना ३५ षटकांचा करण्यात आला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सत्रात चांगलं पुनरागमन करत विंडीजला २४० धावांमध्ये रोखलं.
अवश्य वाचा – Ind vs WI : सचिनला मागे टाकत गेलने रचला इतिहास, तिसऱ्या वन-डेत आक्रमक खेळी