वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आपल्याच संघाचा माजी कर्णधार ब्रायन लाराचा विक्रम मोडला आहे. गुरुवारी भारताविरुद्ध गयाना येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात ख्रिस गेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ख्रिस गेलचा वेस्ट इंडिजसाठीचा २९७ वा वन-डे सामना होता. गेलने लाराचा २९६ सामन्यांचा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : पावसाने सामना थांबवला, विराटने गेलसोबत मैदानातच ठेका धरला

पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पहिला वन-डे सामना रद्द करण्यात आला. मात्र खेळवण्यात आलेल्या १३ षटकांमध्ये गेलला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अवघ्या ४ धावा काढून तो कुलदीप यादवच्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. फलंदाजीसाठी आल्यावर ख्रिस गेलने आपल्या आक्रमक खेळीच्या विरुद्ध जाऊन अनेक चेंडू खेळून काढले. ४ धावा काढण्यासाठी गेलने चक्क ३१ चेंडू खर्च केले. वेस्ट इंडिजकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी गेलला अवघ्या काही धावांची गरज होती, मात्र ही किमया त्याला पहिल्या सामन्यात साधता आली नाही.

Story img Loader