विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. मालिकेतील ४ सामन्यांपैकी भारताने २ सामने जिंकले आहेत. या दोनही सामन्यात रोहित शर्माने दीडशतक झळकावले. पहिला सामना जिंकल्यानंतर रोहितने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. पण चौथ्या सामन्यात त्याला पुन्हा सूर गवसला. शिखर धवन आणि विराट कोहली हे दोघे स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहितने अंबाती रायडूच्या साथीने भारताला ३७७ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात त्याने १६२ धावा केल्या.
या सामन्यात भारताची पहिली फलंदाजी होती. फलंदाजी झाल्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण सुरु झाले. त्यावेळी रोहित शर्मा हा सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. रोहित हा मुंबई इंडियन्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळतो आणि चौथा एकदिवसीय सामनादेखील मुंबईत होता. त्यामुळे रोहितचे चाहते स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यावेळी हे चाहते रोहित.. रोहित.. असे ओरडू लागले. त्यावेळी तसे न ओरडत इंडिया.. इंडिया.. असे ओरडा, असे रोहितने चाहत्यांना सुचवले. आणि आपल्या जर्सीवरील इंडिया हा शब्ददेखील दाखवला.
That Is Rohit
Stand Up Salute@ImRo45 @ImRo45_FC @OfficialRohitFC @TheCricketGirll pic.twitter.com/1KTxKnmAyB— PraBoss Cult Fan (@MrNareshNarshaa) October 30, 2018
दरम्यान, या सामन्यात भारताने विंडीजवर २२४ धावांनी विजय मिळवला. या विजयबरोबरच भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली.