Reactions on Sarfaraz Khan Not Selected for West Indies Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार, २३ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. विंडीज कसोटी मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानची निवड होईल, असे सर्वांना वाटत होते, मात्र यावेळीही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर प्रचंड संतापले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी (२३ जून) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीकेला सामोरे जाणाऱ्या रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना संघातून वगळण्यात आले.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Alzarri Jospeh Banned for 2 Matches by West Indies Cricket Board For On Field Argument with WI Captain Shai Hope vs England ODI Match
अल्झारी जोसेफला रागात मैदान सोडणं पडलं भारी, क्रिकेट वेस्टइंडिजने केली मोठी कारवाई
IND A vs AUS A India A team Ball Tempering Controversy David Warner Asks Cricket Australia Official Statement
IND vs AUSA: भारताच्या दबावामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंग प्रकरण गुंडाळलं; डेव्हिड वॉर्नरचं मोठं वक्तव्य
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य

८० सरासरी, १३ शतके… विंडीज दौऱ्यासाठी अद्याप निवड नाही- सुनील गावसकर

विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या सरफराज खानने निराशा केली. सरफराज खानला संघात स्थान न मिळाल्याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर संतापले. याप्रकरणी गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

हेही वाचा: IND vs WI: व्यस्त वेळपत्रकामुळे वेस्ट इंडिज बोर्ड अडचणीत! WC क्वालिफायर अन् भारताविरुद्धचे सामने खेळाडूंना फोडणार घाम

“आयपीएलच्या आधारे कसोटी संघ निवडायचा असेल तर रणजी करंडक खेळणे बंद केले पाहिजे”, अशी सडकून टीका सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर केली. गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “सरफराज खानने गेल्या तीन हंगामात ८०च्या सरासरीने धावा केल्या असून त्यात १३ शतके झळकावली आहेत. संघात निवड होण्यासाठी त्याला अजून काय करावे लागेल? तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकणार नाही, परंतु तुम्ही त्याला किमान संघात निवडावे.”

गावसकर पुढे म्हणाले, “सरफराजला सांगितले पाहिजे की त्याच्या कामगिरीकडे लक्ष दिले जात आहे. अन्यथा रणजी करंडक खेळणे बंद करा. आपण स्पष्टपणे सांगू या की त्याचा काही उपयोग नाही, तुम्ही फक्त आयपीएल खेळता आणि त्यावरून कसोटी क्रिकेटसाठीही तुम्ही चांगले आहात असे ठरवा.”

सरफराज खानची सरासरी ८०च्या आसपास आहे

२५ वर्षीय सरफराज खानने आतापर्यंत ३७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १३ शतके आणि ९ अर्धशतकांसह ३५०५ धावा केल्या आहेत. सरफराज खानची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३०१ आहे आणि सरासरी ८० (७९.६५) आहे. या महान विक्रमानंतरही सरफराजची कसोटी संघात निवड झाली नाही, हे थोडं आश्चर्यच आहे. एकदिवसीय आणि टी२० कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडला कसोटी संघात स्थान मिळू शकले, तर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सरफराज खानलाही संधी मिळू शकते.

वरिष्ठ खेळाडूंबाबत ‘हे’ वक्तव्य केले

विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ खेळाडूंना आणखी थोडा ब्रेक मिळायला हवा होता, असे सुनील गावसकर यांचे मत होते. गावसकर म्हणतात, “त्यांना २०, २५ जुलैपर्यंत सुट्टी द्यायला हवी होती. आता वरवर पाहता हा संघ १ किंवा २ जुलैपासून सराव सामन्यांसाठी ते जाणार आहेत, त्यामुळे त्यांना किती दिवसांची सुट्टी मिळाली? जेमतेम २० दिवस? त्यांना ४० दिवसांचा ब्रेक का देण्यात आला नाही? नव्या मालिकेसाठी परतल्यावर ते पूर्णपणे ताजेतवाने होऊन परतले असते.

हेही वाचा: IND vs WI: “पुजारालाच का बळीचा बकरा बनवलं जातं?” सुनील गावसकरांनी संघ निवडीवरून रोहित-विराटवर साधला निशाणा

भारताचा विंडीज दौरा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद कुमार सिराज, मुकेश कुमार. जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.