Hardik Pandya: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात अनवधानाने तिलक वर्माचे अर्धशतक हुकल्याने भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात तिसरा सामना खेळणाऱ्या तिलक वर्माचे दुसरे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले, त्यामुळे चाहते कर्णधारावर प्रचंड नाराज झाले. मात्र, विजयानंतर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीला आपला साईन केलेला बॉल देताना दिसत आहे. मात्र, स्वतः स्टँडजवळ जाऊन चेंडू देण्यामागचे कारण जाणून घेतल्यास तुम्हाला हार्दिकची ही कृती आवडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसरा टी२० सामना ७ विकेट्सने जिंकल्यानंतर, हार्दिक पांड्या स्टेडियमच्या स्टँडजवळ पॅड घालून फिरताना दिसत होता त्यानंतर त्याने एका लहान मुलीजवळ जात तिला त्याच्या सहीचा चेंडू दिला. हार्दिक पांड्याला तिच्या हातात चेंडू देत होता पण तो अचानक खाली पडला, त्यानंतर त्याने उडी मारत चेंडू त्या चिमुरडीच्या हातात दिला. हार्दिकच्या कृतीने सर्वांचेच मन जिंकले.

हेही वाचा: ICC ODI Ranking: एकदिवसीय सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारी जाहीर! कुलदीप यादव टॉप-१० मध्ये, बाबरचा शुबमन गिलला दे धक्का

वास्तविक, हार्दिक पांड्या सामना सुरू होण्यापूर्वी नेट सराव करत होता. यादरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हार्दिकच्या एका शॉटने चाहता जखमी झाला. दुखापतीनंतर हार्दिक पांड्याही त्या चिमुरडीच्या दुखापतीमुळे चिंतेत दिसत होता. त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला त्या चिमुरडीवर उपचार करण्याची विनंती केली. भारतीय संघाचे फिजिओ यांनी तात्काळ तिथे जाऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने या चाहत्याला सामना संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली.

हेही वाचा: World Cup 2023: “रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे, पण…” युवराज सिंगने विश्वचषकापूर्वी BCCIकडे केली ‘ही’ मागणी

टीम इंडियाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या त्या जखमी चिमुरडीला भेटायला आला आणि तिला खास भेटवस्तूही दिली. त्याने एका बॉलवर त्याचा ऑटोग्राफ या चाहत्याला दिला. ज्याची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरू आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या सामन्यात तिलक वर्मा ४९ धावांवर फलंदाजी करत होता. हार्दिक पांड्या स्ट्राईक रोटेट करेल आणि तिलक वर्माला स्ट्राइक देईल अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. पण हार्दिक पांड्याने नेमके उलटे केले. त्याने एक मोठा षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला, त्यामुळे क्रिकेट चाहते हार्दिक पांड्यावर नाराज आहेत. सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे. ५ सामन्यांच्या या टी२० मालिकेत वेस्ट इंडिजचा संघ २-१ने आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi hardik pandya won the heart gave a special gift to the injured fan video went viral avw
Show comments